शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

पवारांनी तडजोड केल्याचा आरोप , स्वीकृत नगरसेवक प्रकरण : शहराध्यक्षांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:37 IST

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली असल्याचा आरोप भाजपाच्या सातारा शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांनी केला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा पालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली त्यांना स्वीकृतसाठी संधी दिली गेली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडली. पक्ष विस्तारासह विविध योजना घरोपरी पोहोचविल्या आणि सभासद वाढविले अशा कार्यकर्त्याला स्वीकृतची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र, दीपक पवार यांच्या हट्टासाठी जे उमेदवार फक्त पालिका निवडणुकीपुरतेच भाजपमध्ये होते व नंतर पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर राहिले नाही अशांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली गेली. यासाठी दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.प्रसिद्धी पत्रकावर सुनील कोळेकर यांच्यासह जयदीप ठुसे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राजेंद्र पवार, अप्पा कोरे, नीलेश कदम, प्रदीप मोरे, रवी आपटे, संदीप मेळाट, अमोल कांबळे आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, या संदर्भात दीपक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.(चौकट)... तर कार्यकारिणीचा राजीनामादीपक पवार यांच्या मनमानी कारभाराला आणि शहर कार्यकारिणी पदाधिकाºयांना विश्वासात न घेण्याच्या कृती विरुद्ध शहर कार्यकारिणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण